Kolhapur: रिक्षावाल्याला आत्मविश्वास नडला अन् अपघात घडला; रिक्षा-बसच्या समोरासमोर धडकेत तिघे ठार

0
107

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

हातकणंगले : कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर एस. टी. बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले. शिवानी घेवरचंद खत्री (वय ३२), ललिता हंसराज खत्री (३०) आणि श्रीतेज विलासराव जंगम (१०, रा.

इचलकरंजी) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. रिक्षाचालक आणि सहा वर्षांच्या मुलासह एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.

इचलकरंजी येथील शिवानी खत्री आणि त्यांचे कुटुंब प्रशांत पेटकर (रा. इचलकरंजी) यांच्या रिक्षाने क्र. (एमएच ०९, जे ८९८९) रामलिंग आणि धुळोबा देवदर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूर-सांगली राज्य मार्गावर हातकणंगलेनजीक रामलिंग फाट्यावर त्यांच्या रिक्षाला कोल्हापूरकडून येणाऱ्या कुडाळ ते पंढरपूर एस. टी. बस क्र. (एमएच १४ बीटी २५०९)ने जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला. रिक्षातील शिवानी खत्री आणि त्यांच्या शेजारी राहणारा रितेश जंगम हे दोघे जागीच ठार झाले. रिक्षाचालक प्रशांत पेटकर व रिक्षातील कियान घेवरचंद खत्री (वय ६), ललिता हंसराज खत्री (वय ४०) हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातस्थळी स्थानिक नागरिक आणि स्वप्नील नरुटे यांनी तत्काळ मदत केल्याने तसेच पोलिसांनी अपघातातील वाहने बाजूला केल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. एसटी बसचालक रवींद्र प्रभाकर चव्हाण (रा. पंढरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आत्मविश्वास नडला

समोरून भरधाव एस. टी. बस येत असल्याचे बघूनही माझी रिक्षा रस्ता ओलांडेल, हा आत्मविश्वास रिक्षावाल्याला नडला आणि अपघात घडला. खत्री कुटुंबाचे इचलकरंजी येथे कपडे विक्रीचे दुकान आहे. शिवानी खत्री या पतीला मदत करत होत्या. देवदर्शनासाठी त्या बाहेर पडल्या आणि काळाने डाव साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here