LPG सिलिंडरचे दर 1 फेब्रुवारीला होणार अपडेट; स्वस्त होणार? असा आहे आतापर्यंतचा ट्रेंड

0
64

बजेटच्या दिवशी अर्थात एक फेब्रुवारीला एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट होण्याची शक्यता आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलिंडरचा दर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईमध्ये 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.

यापूर्वी घरगुती सिलिंडरचे दर 30 ऑगस्ट 2023 रोजी बदलले होते. एक मार्च 2023 रोजी एलपीजी सिलिंडरचा दर दिल्लीत 1103 रुपये एवढा होता. यानंतर, एकाच वेळी तो 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. फेब्रुवारीचा ट्रेंड पाहता 2021 मध्ये तीन वेळा सिलिंडरचा दर बदलला होता आणि 100 रुपयांनी वोधारला होता.

फेब्रुवारी 2021 मध्ये तीन वेळा वधारली होती घरगुती सिलिंडरची किंमत –
फेब्रुवारी 2023 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कसल्याही प्रकारचा बदल झाला नव्हता. थेट एक मार्च 2023 रोजीच सिलिंडरच्या किंमतीत बदल झाला होता.

फेब्रुवारी 2021 संदर्भात बोलायचे झाल्यास, बजेटच्या दिवशीच 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाला नव्हता. चार फेब्रुवारीला ग्राहकांना झटका देत सिलिंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

यानंतर बरोबर 11 दिवसांनंतर, अर्थात 15 फेब्रुवारीला आणखी एक झटका बसला सिंलिंडरचा दर 50 रुपयांनी वाढला. यानंतर एक जानेवारी 2021 रोजी सिलिंडरचा जो दर 694 रुपयांवर होता, तो वाढून 769 रुपयांवर पोहोचला. यानंतर 10 दिवसांनंतर हा दर पुन्हा 25 रुपयांनी वाढला आणि सिलिंडर 794 रुपयांवर पोहोचले.

तीन वर्षांत 49 वेळा बदलला कॉमर्शिअल सिलिंडरचा दर –
एकिकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 17 वेळा बदल झाला तर कॉमर्शिअल सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 49 वेळा बदल झाला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ बदलासह कॉमर्शिअल सिलिंडर दिल्लीत 1755.50 रुपये, कोलकात्यात 1869, मुंबईत 1708.50 तर चेन्नईमध्ये 1924.50 रुपयांवर पोहोचला आहे.

आयओसीच्या आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2021 रोजी 19 किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर दिल्लीत 1349 रुपये होता. तेव्हाच्या आणि आताच्या किंमतीत 406.50 रुपयांचा फरक आहे. यावेळीही १ फेब्रुवारीला काही बदल झाल्यास तो कमर्शिअल सिलिंडरमध्ये होऊ शकतो. निवडणुकीचे वर्ष पाहता घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर कमीही होऊ शकतात, असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here