थंडाई अन् गदा, पैलवानांनी अनुभवले मिश्कील अजितदादा

0
57

कोल्हापूर : आपल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वभावानेही तितकेच मिश्कील असल्याचा अनुभव सोमवारी कोल्हापुरातील पैलवानांनी घेतला. भल्या सकाळी थंडाई पित अजित पवार यांनी पैलवानांशी हितगुज तर साधलीच पण गाव, नाव, वय विचारत छोट्या मल्लांची फिरकीही घेतली.

मंत्री पवार यांनी श्री शाहू विजयी गंगावेस तालीमला भेट दिली. यावेळी त्यांनी पैलवानांची संख्या, शौचालय, शाॅवर, निवासाची, अंघोळीची व्यवस्था याची माहिती घेतली. तालमीचा कानाकोपरा तपासत पैलवान कशा प्रकारे कुस्तीचा सराव करतात हे जाणून घेतले. आखाड्यात बसलेल्या छोट्या मल्लांना त्यांचे गाव, नाव, वय विचारत त्यांची विचारपूस केली.

यातील काहींना वय सांगता न आल्याने ‘आता काय विचार करून सांगतो का? असे म्हणत त्यांची फिरकीही घेतली. बहुतांश मल्ल हे सोलापूर, सातारा, लातूर जिल्ह्यातील असल्याचे लक्षात येताच मग कोल्हापूरचे पैलवान किती आहेत? अशी विचारनाही पदाधिकाऱ्यांना केली. तालीमच्यावतीने मंत्री पवार यांचा गदा देऊन सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here