कोल्हापूर : सूर्याच्या उत्तरायण कालखंडातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. मात्र, धूलिकण, ढगाळ वातावरण व हवा प्रदूषणामुळे आवरण तयार होत सूर्यकिरणे विखुरली गेली.
परिणामी, किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंतच सूर्यकिरणे पोहचली.
दरवर्षी २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्तरायण कालखंडातील किरणोत्सवाला सुरुवात होते. गतवर्षीही पहिल्या दिवशी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने झाला नव्हता. महाद्वार रोड कमानीपासून सायंकाळी ५:३० ला या किरणोत्सवाची सुरुवात झाली. ६.१५ ला ती मंदिरातील गर्भकुटीच्या संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत येऊन लुप्त झाली.
किरणोत्सवाचा प्रवास
- महाद्वार रोड कमान : सायंकाळी ५.३०
- गरुड मंडपच्या पाठीमागे : ५:३४
- गरुड मंडपच्या मध्यभागी : ५:४०
- गणपती मंदिराच्या पाठीमागे : ५:५४
- कासव चौक : ६:०१ वा.
- चांदीच्या उंबरठ्याच्या आत : ६.१४
- अंबाबाई मंदिरातील गर्भकुटीच्या
- संगमरवरी पहिल्या पायरीपर्यंत : ६.१५