‘मांजरा’ धरणावरील वीस पाणीपुरवठा योजनांकडे पाटबंधारे विभागाची ४७ कोटींची थकबाकी !

0
73

मांजरा धरणातूनलातूर शहरासह अंबाजोगाई, कळंब, केज, धारूर, लोहटा, भालगाव, वडगाव, युसूफ वडगाव, माळेगाव, धनेगाव, आवाड शिरपुरा, शिराढोण, सारणी, साळेगाव, करंजकल्ला, दाभा, हिंगणगाव आणि चिंचोली माळी आदी वीस पाणीपुरवठा योजना आहेत.

या सर्वांकडे मिळून पाणीपुरवठ्याची ४७ कोटी ७३ लाख ७२ हजार ६८६ रुपयांची थकबाकी आहे. तत्काळ थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठ्याचे कनेक्शन तोडले जाईल, असा इशारा पाटबंधारे विभागाने संबंधितांना दिला आहे.

मांजरा प्रकल्पातून या वीस योजनांसाठी दररोज ७२ हजार ५८० घनमीटर पाण्याची उचल केली जाते. यापैकी लातूर शहरासह ६० हजार घनमीटर पाण्याची उचल दिवसाला केली जाते. या सर्व पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला २.२५ द.ल.घ.मी. पाणी लागते. नित्यनेमाने पाण्याची उचल केली जात असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नित्यनेमाने पाणीपट्टी भरली जात नाही. त्यामुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे. लातूर महापालिकेकडे २६ कोटी ४५ लाख ६१ हजार ५४६ रुपयांची थकबाकी आहे तर लातूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे २ कोटी ८१ लाख ५९ हजार ८४५ रुपयांची थकबाकी आहे.

या योजनांकडे अशी आहे थकबाकी…
योजना थकबाकी

लातूर मनपा २६,४५६,१५४६
मजिप्रा. लातूर २८१,५९,८४५
न.प. अंबाजोगाई ५०,०७१,५०३
न.प. कळंब १६,९४,७४०
केज-धारूर बारा गावे ४४,३२,९८२
म.औ.वि.म. लातूर १२,५५,७६९३२
ग्रा.पं. लोहटा ९३,४४९७
ग्रा.पं. भालगाव ३८,९३८
ग्रा.पं. युसुफ वडगाव २५,५५,३६
ग्रा.पं. माळेगाव ३२,४२२
ग्रा.पं. धनेगाव ४७,८१९
ग्रा.प. आवाड शिरपुरा १०,९०,४५
सारणी ३३,९,१०७
ग्रा.पं. साळेगाव १०,५७,६८
ग्रा.पं. करंज कल्ला ११,३९,१३
ग्रा.पं. दाभा ४०,२१०
ग्रा.पं. हिंगणगाव ५०,२२६
चिंचोली माळी ५० गावे योजना ८८,९५७
धरणातील पाण्याची स्थिती…
मांजरा धरणात सद्य:स्थितीत १६.०१ पाणीसाठा आहे.
मृतसाठा ४७.१३० द.ल.घ.मी.

जिवंत पाणीसाठा २८.३३४ द.ल.घ.मी.
२० पाणीपुरवठा योजना या प्रकल्पावर अवलंबून आहेत. त्यातील केज, धारूर पाणीपुरवठा योजनेवर बारा गावांसाठी योजना आहे, तर चिंचोली माळी या योजनेवर १५ गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. यंदा धरण क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे प्रकल्प भरलेला नाही. त्यामुळे सिंचनाचे पाणी बंद आहे. फक्त पिण्यासाठी राखीव आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्याकडील थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहनही पाटबंधारे विभागाने केले आहे.
मांजरा धरणात सद्य:स्थितीत २८.३२४ द.ल.घ.मी. जिवंत पाणीसाठा आहे. त्यामुळे सर्व पाणीपुरवठा योजनांनी पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाण्याची थकबाकी तत्काळ भरून जलसंपदा विभागाला सहकार्य करावे. संबंधित एजन्सीने थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा बंद केला जाईल. संबंधित संस्थांना या अनुषंगाने कळविण्यात आले आहे. सर्व योजनांकडे मिळून ४७ कोटी ७३ लाख ७२ हजार ६८६ रुपयांची थकबाकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here