नवी दिल्ली: बीसीसीआय सचिव जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जय शाह आयसीसी निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी मागील काही दिवसांपासून चर्चा होती.
मात्र, इंडोनेशिया येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. कारण सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शाह यांच्या नावाची घोषणा झाली आहे
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जय शाह यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढवण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष श्रीमान शम्मी सिल्वा यांनी दुसऱ्यांदा जय शाह यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव दिला होता आणि या नामांकनाला ACC च्या सर्व सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला.cजय शाह यांनी जानेवारी २०२१ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांच्याकडून ACC ची सूत्रे हाती घेतली होती. आशियाई क्रिकेट परिषदेचा कारभार सांभाळणारे ते सर्वात तरूण अध्यक्ष ठरले.
दरम्यान, जय शाह यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संपूर्ण आशियाई देशांमध्ये क्रिकेटचा प्रचार आणि विकास करण्यात लक्षणीय एसीसीने चांगली प्रगती केली. २०२२ मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेने ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये आणि मागील वर्षी वन डे फॉरमॅटमध्ये आशिया चषकाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवून आठव्यांदा आशिया चषक जिंकण्याची किमया साधली.