कोल्हापूर प्रतिनिधी : मेघा पाटील
कोल्हापूर: ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमन कोल्हापूर महाविद्यालयातील पर्यावरणशास्त्र विभाग अंतर्गत मेकिंग ऑफ इको फ्रेडली प्रॉडक्ट्स फ्रॉम वेस्ट मटेरिअल्स कार्यशाळा दिनांक २२ जानेवारी ते २७ जानेवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आली .
या कार्यशाळेमध्ये बी एस सी भाग १ आणि २ या विद्यार्थिनींनी वेस्ट मटेरियल पासून विविध गोष्टी बनवल्या आहेत. विशेषतः सुकलेल्या फुलांपासून धूप, नारळाच्या करवंटी पासून झाडे लावण्यासाठी कुंडी, मातीचे दागिने आणि इको फ्रेंडली पेन अश्या वस्तूंची निर्मिती विद्यार्थिनींनी केली आहे. या कार्यशाळेतून पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापन या मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. या कायशाळेसाठी प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका ज्योती हिरेमठ (हेड, फॅशन विभाग) आणि श्री सागर पाटील मॅनेजिंग डायरेक्टर (एस पी ९ चॅनेल) यांची उपस्थिती लाभली. ही कार्यशाळा प्राध्यपिका पूजा सरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली असून विभागातील शिक्षक वर्ग प्राध्यापिका अनिशा पाटील आणि दीप्ती पाटील यांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेसाठी सायबर संस्थेचे सेक्रेटरी आणि मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. आर. ए . शिंदे व प्राचार्य डॉ. ए . आर. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.