सायबर महिला महाविद्यालयामध्ये वॉलपेपर डिस्प्ले फॅशन कम्युनिकेशन या विषयावरती भिंतीपत्र आयोजित …

0
137

प्रतिनिधी : प्राध्यापिका मेघा पाटील

दि. ३१/०१/२०२४
सायबर महिला महाविद्यालयामध्ये वॉलपेपर डिस्प्ले फॅशन कम्युनिकेशन या विषयावरती भिंतीपत्र आयोजित करण्यात आले होते. या अंतर्गत बी.ए. ड्रेस मेकिंग अँड फॅशन विभागाच्या तृतीय वर्षातील 50 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.

या विद्यार्थिनींनी फॅशन कम्युनिकेशन मध्ये फॅशन जर्नलिझम, फॅशन फोटोग्राफी फॅशन ब्लॉगिंग, फॅशन रायटिंग या विषयावरती भिंती पत्रक तयार केले होते. या प्रदर्शनात श्री. सागर पाटील, एस.पी ९ मराठी न्यूज चॅनलचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

उद्घाटन भाषणात विद्यार्थिनींच्या कामाचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी,विद्यार्थिनी पोस्टर प्रेझेंटेशन साठी मार्गदर्शन विभाग प्रमुख सौ. ज्योती हिरेमठ तसेच या विभागातील सौ. अर्चना पाटील, सौ. प्रज्ञा कापडी सौ. सारिका भोकरे, कु. श्रुती गवळी इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव कार्यकारी विश्वस्त डॉ. आर. ए. शिंदे तसेच सी.ए. ऋषिकेश शिंदे,डॉ. ए. आर. कुलकर्णी
Principal, CNCVCW यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here