राम’मय’ झाली अवघी मुंबई! गेटवे ऑफ इंडियाला पार पडलं गीतरामायण; सियारामच्या भूमिकेत होते ‘हे’ मराठी कलाकार

0
195

अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला पार पडला. ऐतिहासिक सोहळ्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर प्रभू राम आल्याने देशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

देशभरात विविध ठिकाणी महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकतंच मुंबई जय श्री रामाच्या घोषणांनी न्हाऊन निघाली.

नुकतंच महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ‘स्वयें श्रीराम प्रभू ऐकती, दशरथा घे हे पायसदान, राम जन्मला ग सखे, चला राघवा चला, स्वयंवर झाले सीतेचे’, अशा अजरामर गीतांचे सादरीकरण करुन उपस्थितांना मोहिनी घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here