तुम्हीही आलं फ्रिजमध्ये ठेवता का? ‘हे’ ३ पदार्थ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका, बघा काय होतं….

0
89

हल्ली फ्रिजचा वापर बऱ्याच घरांमध्ये स्टोरेज बॉक्स म्हणून केला जातो. जे पदार्थ उरले किंवा बाजारातून जास्तीचे आणले ते सगळे पदार्थ फ्रिजमध्ये कोंबून ठेवले जातात. बऱ्याचजणी ८- १० दिवसांच्या भाज्या एकदम घेतात आणि सगळ्याच फ्रिजमध्ये भरून ठेवतात.

पण फ्रिजमध्ये असलं तरी ते अन्न खराब होण्याची प्रक्रिया सुरू असतेच. फक्त फरक एवढा असतो की ही क्रिया खूप सावकाश होते. त्यामुळे अन्न खराब होत आहे, हे आपल्याला कळतही नाही. आपण ते खातो आणि तेच आपल्या आरोग्यासाठी जास्त धाेकादायक ठरतं (Avoid keeping these 3 ingredients in refrigerator). काही पदार्थ तर फ्रिजमध्ये मुळीच ठेवू नयेत. ते पदार्थ कोणते ते पाहा…(we should not keep these 3 things in fridge)

फ्रिजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत?

कोणते ३ पदार्थ फ्रिजमध्ये कधीच ठेवू नयेत, याविषयीचा एक माहितीपूर्ण व्हिडिओ manvirdosanjh या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

१. आलं

या व्हिडिओनुसार आलं चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका. कारण फ्रिजमधल्या दमट- ओलसर वातावरणामुळे आलं लवकर खराब होतं. त्याचा सुगंध कमी होत जातो. त्यामुळे आलं फ्रिजमध्ये न ठेवता नेहमी कोरड्या थंड जागेत ठेवावं.

२. कांदा

कांदे आपण कोरड्या जागेत साठवतो. पण कधीतरी चिरलेला कच्चा कांदा उरला तर तो फ्रिजमध्ये ठेवला जातो.

किंवा कच्चा कांदा असणारा एखादा पदार्थ उरला तरीही आपण तो सहज फ्रिजमध्ये ठेवून देतो आणि नंतर खातो. पण असं करणं आरोग्यासाठी घातक आहे. कारण कांदा चिरल्यानंतर काही तासांतच त्यातून काही गॅसेस तयार होतात, जे आरोग्यासाठी चांगले नसतात.

३. केचअप

टोमॅटो केचअपदेखील कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. मुळातच त्यांच्यात असे घटक असतात, ज्यामुळे ते बाहेरच्या वातावरणात राहू शकेल. त्यामुळेच कोणत्याही दुकानांमध्ये, मॉलमध्ये केचअप कधीही फ्रिजमध्ये ठेवलेले नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here