कधीच वृद्ध दिसणार नाही मनुष्य, वैज्ञा‍निकांनी शोधला नवा उपाय; सुरकुत्याही होतील दूर!

0
53

वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि जसजसं वय वाढतं आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात. आजारही मागे लागतात. कोशिका कमजोर होऊ लागतात. पण आता असं होणार नाही. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, त्यांनी ‘जीवन का अमृत’ शोधलं आहे.

आता एकच उपचार करून इतकी शक्ती वाढेल की, कोशिका कधीच कमजोर होणार नाही. शरीरावर एखाद्या आजाराने हल्ला केला तर लगेच बरं होईल.

मिररच्या रिपोर्टनुसार, कोल्ड स्प्रिंग हार्बर लेबोरेटरी न्यूयॉर्कच्या अभ्यासकांनी कमजोर कोशिका पुन्हा जिवंत करण्याचा एक उपाय शोधला. सामान्यपणे आपल्या शरीरात टी सेल्स इम्यूनिटी मजबूत करतात, ज्यामुळे आपल्या शरीराला आजारांपासून लढण्यास मदत मिळते. वजन कमी करणं असो वा आजार दूर करणं असो या टी सेल्स कामात येतात.

इतकंच नाहीतर या अशा सीनेसेंट कोशिकांवरही हल्ला करतात ज्या अनेक आजारांसाठी जबाबदार असतात. पण जसजसं आपलं वय वाढत जातं
पर भी हमला करती हैं, जो कई तरह की बीमार‍ियों के ल‍िए जिम्‍मेदार होती हैं. जिनसे हम बाद में पूरा जीवन जूझते रहते हैं. लेकिन जैसे-जैसे शरीरात कोशिका तयार होणं बंद होतं. यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं आणि आजार होऊ लागतात.
वैज्ञानिकांनी या टी सेल्सना सीएआर टी-सेल्समध्ये संशोधित केलं आहे. ज्या या वृद्ध कोशिकांवर हल्ला करतात आणि त्यांना दुरूस्त करतात. पहिला प्रयोग उंदरांवर करण्यात आला आणि रिपोर्ट हैराण करणारा होता.

नेचर एजिंग जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, उंदीर निरोगी जीवन जगले. त्यांच्या शरीराचं वजन कमी झालं. पचनक्रिया चांगली झाली. इतकंच नाही तर शरीरातील शुगरही नियंत्रित झाली. झालं असं की, त्यांचं शरीर तरूण उंदरांसारखं काम करू लागलं.

रिसर्च टिममधील सदस्य आणि सहायक प्रोफेसर कोरिना अमोर वेगास यांनी सांगितलं की, जर आम्ही हे वृद्ध उंदरांना दिलं तर ते पुन्हा तरूण दिसू लागतात. जर हे तरूण उंदरांना दिलं त्यांचं वय कमी होतं. आतापर्यंत अशी थेरपी नव्हती. हा उपचार सगळ्यांना अवाक् करणारा आहे. यामुळे निश्चितपणे मनुष्यांचं वय कमी दिसू शकतं.

खास बाब म्हणजे हे औषध रोज घेण्याची गरज पडणार नही. कारण टी-सेल्सचं आयुष्य खूप जास्त असतं. ते शरीरातूनच आपलं जेवण घेतात. लठ्ठपणा आणि शुगरच्या रूग्णांसाठी हे रामबाण ठरू शकतं. टी-सेल्समध्ये स्मरणशक्ती विकसित करणे आणि आपल्या शरीरात जास्त वेळ टिकून राहण्याची क्षमता असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here