प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
नागपूर : घरात दारु पिऊन येऊन पती वाद घालत असल्याने वादाला कंटाळून पत्नी माहेरी गेली. राग शांत झाल्यानंतर तिने आपल्या नवऱ्याला फोन केला. मात्र दोन तीन दिवस फोन लागत नाही यामुळे चिंता वाढली. तिने तातडीने पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपला नवरा ड्युटीवर आला आहे का याची चौकशी केली. नवरा ड्युटीवर आला नाही मग कुठे गेला यातून जीव कासाविस झाला.पोलीस उपनिरीक्षक गोपाळ गोळे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आपलं आयुष्य संपवल्याची माहिती सहकाऱ्यांनी दिली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ते गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होते. त्यातून हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही धक्कादायक घटना घडली. पोलीस उपनगिरीक्षक गोपाळ यांच्या आयुष्यात एक दुर्घटना घडली होती. त्यांच्या भावाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याचा मानसिक धक्का त्यांना बसला. त्यातून सावरणं कठीण जात होतं. त्यातच त्यांना दारुचंही व्यसन लागलं आणि घरी बायकोसोबत वाद होऊ लागले.
दारुचं व्यसन, मासिक ताण आणि या सगळ्यातून सावरणं कठीण झाल्याने दिवसेंदिवस नवरा बायकोमध्ये वाद वाढत गेले. बायकोनं अखेर माहेरी जाण्याच्या निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांपासून गोपाळ गोळे हे पोलीस वसाहतीत एकटेच राहात होते. तणावातून हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस तपास अजून सुरू आहे.