स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका ठरलं तर मग अवघ्या काही वेळातच उंचीच्या शिखरावर पोहचली आहे. ठरलं तर मग मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमापोटी मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून नंबर वन वर आहे.
सध्या या मालिकेला वेगळं वळण मिळालं असून. अर्जुन-सायली माथेरानला फिरायला जातात. लग्नानंतर अर्जुन-सायलीने हनीमूनला जावं अशी अर्जुनच्या आईची इच्छा होती.
आईच्या सांगण्यावरुनच हो नाही म्हणता म्हणता माथेरानच्या प्लॅनवर शिक्कामोर्तब होतं. सायली-अर्जुनवर प्रेक्षक जीवापाड प्रेम करतात. अवघ्या काही वेळातच प्रेक्षकांनी ही मालिका डोक्यावर घेतली आहे.
मात्र अर्जुनने आपल्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे हनीमून नाही तर या ट्रीपला फ्रेण्डमून म्हणून जाऊया असं सांगून तो सायलीचं मन वळवतो. माथेरान सफरीमध्ये नेमक्या काय गंमती-जंमती पाहायला मिळणार हे लवकरच कळेल.
मात्र आज समोर येणाऱ्या भागात एक गंमतीशीर गोष्ट पहायला मिळणार आहे. सुरुवातीला अर्जून-सायली माथरानमधील एका मंदिरात जातात. त्यांचा पाठलाग करत प्रियाही तिथे पोहचते.
तिथे पोहचल्यावर सायली देवाजवळ मधू भाऊंच्या सुटकेसाठी प्रार्थना करते आणि म्हणते. मधू भाऊंच्या केसमध्ये अर्जूनला यश दे ते खूप कष्ट घेतायेत अशी प्रार्थना सायली देवाजवळ करते. यावेळी अर्जून फोनवर बोलण्यामध्ये व्यस्त असते. तो मंदिराबाहेर फोनवर बोलतना दिसतोय.