देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल : रघुनाथ माशेलकर

0
65

कोल्हापूर : भारताची अर्थव्यवस्था ३० ट्रिलियन डॉलर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, परंतु ही वाढ नुसतीच नको. निरक्षरता, गरिबी, भूकबळी या समस्यांचे आव्हान असणाऱ्या भारत ७५ आणि वेगाने पुढे जाणाऱ्या इंडिया ७५ यांच्यातील दरी आधी संपवावी. देशाला विश्वगुरू होण्याआधी विश्वमित्र बनावे लागेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

आजरा येथील ज्येष्ठ पत्रकार, शिवभक्त, शिक्षक सु. रा. देशपांडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त डॉ. माशेलकर यांना सु. रा. देशपांडे स्मृती गौरव पुरस्कार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते देण्यात आला.

डॉ. माशेलकर म्हणाले, भारतातील टायर थ्री शहरात राहणारे ५० टक्के नागरिक अजूनही गरीब आहेत. शंभरपैकी फक्त २४ महानगरेच विकसित झालीत. देशातील प्रत्येक सहावी व्यक्ती झोपडपट्टीत राहते. सहापैकी एक व्यक्ती अजूनही निरक्षर आहे. १५ टक्के लोक गरीब आहेत. हा बदल झाला तरच देश विश्वगुरू बनेल. एकीकडे नवीन पिढीच्या आकलनाचा वेग इतका मोठा आहे, की त्यांच्यासाठी शिक्षकांची कमतरता भासणार आहे, दुसरीकडे हुशार मुलांना गरिबीमुळे, तंत्रज्ञानाची साधने उपलब्ध न झाल्यामुळे आत्महत्या करावी लागते.

नव्या भारताचे सूत्र

डॉ. माशेलकर यांनी नवा भारत कसा असावा याचे सूत्र मांडले. संतुलित, स्त्री-पुरुषांना समान संधी असलेला, जातीपातीच्या पलीकडच्या भारताची संकल्पना मांडली. यामध्ये सांस्कृतिकतेचा अभिमान असलेला, इतर धर्माचा आदर करणारा, शिक्षणाचा योग्य मार्ग आणि अधिकार, नुसते श्रीमंत, गरिबीची दरी वाढवणारी समृद्धी नको, कुपोषणमुक्त, योग्य अन्नाचे पोषण आणि आनंदी असणारा समाज अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here