कोकरूड/ प्रतापराव शिंदे
स्व वस्ताद जगन्नाथ जाधव यांच्या पुण्य स्मरणार्थ, चिंचोली ता शिराळा येथे आयोजित कुस्ती मैदानात हनुमान कुस्ती आखाडा , मल्लविद्या कुस्ती क्रेंद्र शेडगेवाडी आणि कुस्ती निवेदक सुरेश जाधव व दिनेश जाधव मित्र परिवार यांच्या वतीने खानापूर ता. भुदरगड येथील हलगी वादक मारुती साताप्पा मोरे यांना महाराष्ट्राचा हलगी सम्राट
हा पुरस्कार ऑलिंपिकवीर बंडा- पाटील रेठरे यांच्या हस्ते देऊन सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. मारुती मोरे हे गेली पंधरा वर्षे हलगी वादन करित आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावातील कुस्ती मैदाने, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी हलगी वादन करुन
आपली कला सादर केली आहे.
मोरे यांनी हलगी सम्राट सचिन काकासो आवळे यांच्या कडून हा कलेचे मार्गदर्शन घेतले आहे. हलगी वादक मारुती मोरे यांच्याबरोबर घुमके वादक अक्षय भोरे व ओंकार माने, कैंताळ वादक अनिल कांबळे, बाबूराव चव्हाण, रविराज कांबळे हे सहकारी कलाकारांचे सहकार्य लाभत आहे.
चिंचोली येथील कुस्ती मैदानातील कार्यक्रमात उपमहाराष्ट्र केसरी संपतराव जाधव, कुस्ती संघटक आनंदराव पाटील, माजी सरपंच शरद पाटील, मल्लविद्या कुस्ती क्रेंद्राचे वस्ताद राहुल पाटील, पै. धनाजी जाधव आदींसह चिंचोली गावासह, परिसरातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.