कोल्हापुरातील माणगांवात देशभक्तीचा जागर, राष्ट्रगीताने ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू होणार

0
62

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

अभय व्हनवाडे रूकडी-माणगांव : माणगाव येथे देशभक्तीचा जागर होण्यासाठी गावातील प्रमुख चौकात दहा ध्वनीयंञणा बसविण्यात आले आहे. दररोज सकाळी राष्ट्रगीताने ग्रामपंचायतीचा कामकाज सुरू होणार आहे.

सरपंच राजू मगदूम यांच्या कल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

माणगांव ग्रामपंचायतीचा जिल्हातील नाविन्यपूर्ण योजना राबविणारी ग्रामपंचायत म्हणून उल्लेख केला जातो. ग्रामपंचायतीस स्मार्ट व्हिलेज म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार ही प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतीने नुकतेच गोबरधन योजना कार्यान्वित केली असून स्वच्छ भारत योजनेतून 50 लाखाचा खर्च करून कचऱ्यापासून वीजनिर्मिती योजना सुरू केली आहे. ही योजना राबविणारी जिल्हातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

ध्वनीयंञणाच्या माध्यमातून दररोज सकाळी 9 वाजता राष्ट्रगीत सुरू करण्यात येणार असून. गावातील नागरिक जेथे असतील तिथेच थांबून राष्ट्रगीताचा सन्मान करण्याचे आहे. युवकाच्यात व नागरिकाच्यात देशभक्ती वाढावी याकरिता या माध्यमाचा वापर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना तात्काळ सूचना अथवा माहिती देण्यासाठी व शासनाच्या विविध योजनाची माहिती व्हावी यासाठी दररोज ध्वनीयंञणा सुरू राहणार आहे. आपत्कालीन परिस्थिती प्रसंगी संपूर्ण गावाला एकाच वेळी सूचना करता यावे व सुरक्षितता वाढावी यासाठी ही यंञणेचा वापर होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here