Alto, Swift सह ‘या’ कारवर मोठा डिस्काउंट, 62 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी!

0
75

 नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर बाजारात आणल्याचे दिसून येत आहे. या फेब्रुवारी महिन्यात मारुती सुझुकी आपल्या अनेक कारवर ग्राहकांना डिस्काउंट ऑफर देत आहे.

यामध्ये ऑटो K10 पासून ते स्विफ्ट पर्यंत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे.

Maruti Suzuki Alto K10
ऑटो K10 च्या पेट्रोल व्हेरिएंटवर 62,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. 40,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे. सीएनजी मॉडेल्सवर 39,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत.

Maruti Suzuki S-Presso
मारुती सुझुकीच्या S-Presso AMT व्हर्जनवर फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 61,000 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत, ज्यामध्ये 40,000 रुपयांपर्यत कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. तसेच, मॅन्युअल व्हेरिएंटवर 56,000 रुपयांचे बेनिफिट्स आहेत.

Maruti Suzuki Celerio
मारुती सुझुकी सेलेरिओवर 61,000 रुपयांचे बेनिफिट्स देखील दिले जात आहेत, ज्यात 40,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. मारुती सुझुकी सेलेरिओ CNG वर 36,000 रुपयांचे बेनिफिट्स उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki Swift
मारुती सुझुकी स्विफ्टला लवकरच अपडेट मिळणार आहे. हे चाचणी दरम्यान दिसून आले आहे. सध्या स्विफ्टवर 42,000 रुपयांच्या किमतीचे बेनिफिट्स मिळत आहेत. ज्यामध्ये 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

Maruti Suzuki Dzire
मारुती सुझुकी डिझायरलाही या वर्षी अपडेट मिळेल. चाचणी दरम्यान डिझायर फेसलिफ्ट देखील दिसली आहे. सध्या मारुती सुझुकीच्या या मॉडेलवर 37,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळू शकतात, ज्यामध्ये 15,000 कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांचे कॉर्पोरेट बेनिफिट्स यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here