‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस *(Nick Jonas) यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. 2018 मध्ये राजस्थानातील एका भव्य पॅलेसमध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. निक जोनास लोकप्रिय हॉलिवूड गायक आहे.
निक जोनासचे कुटुंब भारतीय पद्धतीचा आलिशान लग्नसोहळा पाहून चकित झाले होते. लग्नाचा एकूण खर्च पाहून शॉक झालो होतो असा खुलासा त्याने नुकताच केला आहे.
निक जोनास आपल्या दोन्ही भावांसोबत जेम्स कॉर्बिनच्या शोमध्ये गेला होता. यावेळी त्यांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला. कारमध्ये बसलेल्या तीनही भावांना शोच्या होस्टने प्रश्न विचारले. तसंच एकाच्या उत्तरावर दोघांचंही तेच उत्तर असतं का हे बघण्यासाठी लाय डिटेक्टर लावलेलं होतं. यावेळी निकला विचारण्यात आलं, “तुझ्या लग्नात एवढे सगळे फंक्शन पाहून तुला असं वाटलं का की आता बस झालं हे लग्न?” यावर निक हसतच म्हणाला, “हो, विशेषत: बिल बघितल्यानंतर वाटलं.”