शेतीसह पिकांचे वन्यप्राण्यांकडून विशेषतः गवा रेडय़ांकडून मोठे नुकसान होत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱयांनी शेतालगत तारेचे कंपाऊंड करत जोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे शॉक लागून दोन गवे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ढेबेवाडी विभागातील बोर्गेवाडी (सळके, ता. पाटण) येथील घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी दोन शेतकऱयांकर वन विभागाने कारकाई केली आहे.
वन विभागाकडून सळके खालील बोर्गेवाडी येथील शिवारात विजेचा शॉक लागून दोन गवे मृत झाल्याची माहिती वन विभागास मिळाली होती. त्या गव्यांच्या मृतदेहाची विल्हेकाट लावताना वन विभागाने बोर्गेवाडीतील सत्यवान ज्ञानदेव कदम व लक्ष्मण तुकाराम बोरगे या दोघांना रंगेहाथ पकडले.
या दोघांनी शेती पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्याच्या हेतूने शेताभोवती तारेचे कंपाऊंड घातले होते. तसेच या कंपाऊंडला बेकायदेशीरपणे वीजप्रवाह जोडला होता. रात्रीच्या वेळी या परिसरात आलेल्या दोन गव्यांचा तारांना स्पर्श होऊन विजेचा जोरदार शॉक लागला. यात दोन्ही गवारेडे मृत्युमुखी पडले.
यानंतर हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून मृत गकारेडय़ांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू होते, असेही वन विभागास समजले होते. त्याचवेळी घटनास्थळी पोहोचून वन विभागाने दोन्ही शेतकऱयांना ताब्यात घेतले.
याबाबत सणबूरच्या वनपालांनी दिलेल्या तक्रारीकरून शेतकऱयांकर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सातारा जिल्ह्याच्या उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक उपवन संरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, वनपाल बोडके, वनरक्षक अमृत पन्हाळे, भोसगावचे वनपाल शशिकांत नागरगोजे यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. वनपाल बोडके व वनरक्षक अमृत पन्हाळे हे अधिक तपास करीत आहेत.