6 फेब्रुवारी 2024 : बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीदेखील अभिनयाच्या दुनियेत अजूनही ॲक्टिव्ह आहेत. त्यांचा बुलंद आवाज आणि दमदार ॲक्टिंग याचा लोकांवर आजही तितकाच प्रभाव पडतो.
अयोध्येतील राम मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावरील एक प्लॉट खरेदी केल्यामुळे बिग बी यांचं नाव नुकतंच चर्चेत आलं होतं. पण बच्चन कुटुंबाची केवळ अयोध्येतच नाही तर मुंबईत आणि देशभरातही अनेक ठिकाणी मालमत्ता आहे. अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील जुहूसारख्या पॉश भागात 5 बंगले आहेत. मात्र पाच बंगले असले तरी बच्चन फॅमिली कुठे राहते माहिती आहे का ?
मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबियांना एकत्र राहणंच आवडतं. याच कारणामुळे मुंबईसह देश-विदेशात अनेक मालमत्ता असूनही अभिषेक-ऐश्वर्या हे अमिताभ-जया यांच्यासोबत ‘जलसा’मध्ये म्हणजेच जुहू येथील बिग बी यांच्याच यांच्याच बंगल्यात राहतात.
केवळ अमिताभ बच्चनच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी, अनिल कपूर, अजय देवगण, सनी देओल असे अनेक स्टार्स इथे राहतात. 10 हजार स्क्वेअर फुटांच्या ‘जलसा’ या बंगल्यात केवळ बच्चन कुटुंबच नाही तर अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाही तिच्या दोन मुलांसोबत (नव्या नंदा नवेली आणि अगस्त्य नंदा) राहते. श्वेता बच्चन हिचं दिल्लीस्थित निखिल नंदाशी लग्न झालं असून तो एक प्रसिद्ध व्यापारी आहे. मात्र मुलांच्या करिअरमुळे श्वेता नंदा मुंबईत शिफ्ट झाली असून गेली अनेक वर्ष ती इथेच राहते.
बच्चन कुटुंबाकडे आहेत 5 बंगले
जलसा व्यतिरिक्त जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम (JVPD स्कीम) च्या चार मोठ्या मालमत्ता बच्चन कुटुंबाच्या नावावर आहेत. अलीकडेच अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांचा दुसरा प्रसिद्ध बंगला ‘प्रतीक्षा’ मुलगी श्वेता नंदा हिला भेट म्हणून दिला. त्याची बरीच चर्चा झाली. जलसा आणि प्रतीक्षासोबतच अमिताभ बच्चन हे ‘जनक’, ‘वत्स’ आणि जुहू येथील एका मोठ्या बंगल्याचेही मालक आहेत.
या मालमत्तेपैकी जनक हा बंगला , त्यांचं ऑफीस म्हणून वापरला जातो. तर वत्स हा बंगला एका बँकेला भाडेतत्त्वावर देण्यात आला आहे. अमिताभ बच्चन यांच्या या मालमत्तेशिवाय अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांनी बीकेसी येथे एक आलिशान फ्लॅटही गुंतवणूक म्हणून खरेदी केला आहे. मात्र या दोघांचाही सध्या तेथे शिफ्ट होण्याचा कोणताही विचार नाही.
सर्वात श्रीमंत कोण ?
बच्चन कुटुंबात फक्त बिग बी हेच नव्हे तर इतरही अनेक सुपरस्टार आहेत. जे दरवर्षी कोट्यवधींची कमाई करतात. अमिताभ बच्चन वयाच्या 81 व्या वर्षीदेखील अभिनयाच्या दुनियेत अजूनही ॲक्टिव्ह आहेत.
बी हे एका चित्रपटासाठी 6 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आकरतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ यांचे नेटवर्थ 3,190 कोटी रुपये आहे. तर बच्चन कुटुंबातील सून म्हणजेच सुपरस्टार ऐश्वर्या राय बच्चन हिच या यादीत दुसरं नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या हिचे नेटवर्थ 776 कोटी रुपये आहे. ऐश्वर्या ही फक्त चित्रपटच नव्हे तर ब्रँड शूटमधूनही करोडोंची कमाई करते.
या लिस्टमध्ये तिसरं नाव आहे ते अमिताभ बच्चन यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचं. रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांचं नेटवर्थ 640 कोटी रुपये आहे. काही महिन्यांपूर्वीच रिलीज झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम’ त्यांनी अभिनय केला होता. अमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चन याच्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचं नेटवर्थ 212 कोटी रुपये आहे. अभिषेक सध्या चित्रपटांमध्ये एवढा दिसत नसला तरी तो प्रो कबड्डी टीम, फुटबॉल टीम आणि ब्रँड्समधूनही मोठी कमाई करतो.
अमिताभ बच्चन यांची लाडकी मुलगी श्वेता बच्चन हिचं नेटवर्थ 60 कोटी रुपये आहे. तर बिग बी यांची नात आणि श्वेता बच्चन हिची मुलगी नव्या नवेली नंदा हिचं नेटवर्थ 15 कोटी रुपये आहे. अमिताभ भ बच्चन यांचा नातू आणि श्वेचा बच्चन हिचा मुलगा अगस्त्य याने नुकतंच ‘द आर्चिज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रिपोर्ट्सनुसार त्याचं नेटवर्थ 2 कोटी रुपये आहे.