लता मंगेशकर ‘या’ गाण्याला अश्लील म्हणत स्टुडिओच्या बाहेर पडल्या अन् मग…

0
83

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची 6 फेब्रुवारी 2024 ला जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या जाण्याने कलाविश्वासह संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला होता.

पण त्यांच्या गाण्यातून त्या आजही आपल्यामध्ये आहेत असंच जाणवतं. त्यांची गाणी कायम लोकांच्या मनात जिवंत आहेत आणि राहणार. लता दीदींच्या आवाजाची जादू आजही लोकांना भुरळ घालते.

वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्यानंतर एक प्लेबॅक सिंगर म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली खरी पण त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं. (Lata Mangeshkar walked out of the studio song lyrics is obscene and then entertainment news in marathi)


सहा दशकांची कारकीर्द यशांनी भरलेली स्वर कोकिळा यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. त्यांचा सूरांनी कोणाला मंत्रमुग्ध केलं तर कोणाच्या डोळ्यात पाणी आणलं, अगदी कोणाच्या हृदयात देशभक्ती निर्माण केली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, लता दिदींचं खरं नाव हे हेमा होतं. जन्मानंतर 5 वर्षांनी आई वडिलांनी त्यांचं नाव बदलून लता ठेवलं.

जेव्हा त्यांच्या गाण्याचा विषय निघतो तेव्हा त्यांचं पहिलं गाणं कधीच रिलीज झालं नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? 1942 मधील ‘किती हसाल’ या मराठी चित्रपटातील ‘नाचू या गडे’ लता दीदींनी गायलं होतं. पण चित्रपटाच्या फायनल कटमध्ये ते गाणं काढून टाकण्यात आलं. म्हणून लतादीदींचं पहिलं गाणं कधीच रिलीज झालं नाही.

त्याशिवाय एका हिंदी गाण्याबद्दलही असाच एक रंजक किस्सा आहे. गाण्याचे शब्द अश्लील वाटले म्हणून लतादीदी स्टुडिओमधून निघून गेल्या होत्या. 1987 मधील दिल तुझको दिया या चित्रपटातील एका गाण्याबद्दल आम्ही बोलत आहोत. मीडिया रिपोर्टनुसार राकेश कुमार यांचा या चित्रपटात कुमार गौरव, लीला चिटणीस, अमरीश पुरी, अरुणा इराणी हे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटातील वादा ना तोड वादा ना तोड…हे गाणं लता दिदींनी गायलं होतं. पण या गाण्याचे बोल त्यांना आक्षेपार्ह वाटले होते म्हणून त्यांनी गाण्यास नकार दिला होता.

या गाण्याचे काही बोल असं होते की, वादा ना तोड वादा ना तोड मेरी चढती जवानी तडपे. लता दिदींना हे शब्द आक्षेपार्ह वाटले आणि त्यांनी गाण्यास नकार दिला. हे बोल ऐकून त्या इतक्या अवस्थ झाल्या की त्या स्टुडिओमधून निघून गेल्यात. लतादीदींना जाताना पाहून राजेश रोशन टेन्शनमध्ये आलेत. त्यांनी लतादीदींना थांबवलं आणि गाण्याबद्दल बोलायची संधी मागितली.

राजेश यांनी लतादिदींना त्यांच्या वडिलांच्या चित्रपटातील गाण्याची आठवण करुन दिली. चित्रलेखा या चित्रपटातील सखी री मेरा मन उलझे तन डोले हे गाणं आठवतं का असं विचारलं.

त्यावर दीदी म्हणाल्यात हो आठवत ना. तुम्ही ज्या गाण्यातील शब्दांवर आक्षेप घेतला आहे. त्या गाण्यातील आणि या गाण्यातील भावना एकच आहेत. पण तरुणाई या शब्दाचा गैरसमज करत असतात. पण जेव्हा लतादीदी यांनी साहिर, ग्रेस जीनियस रोशन यांचं नाव ऐकलं तेव्हा त्यांनी हे गाणं गाण्यास होणार दिला. मग या गाण्याची रिकॉर्डिंग झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here