कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
समाजातील अनेक क्षेत्रातील वेगवेगळ्या स्वरूपात काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तिंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या पुरस्काराने नव्या पिढीला प्रेरणा मिळते असे प्रतिपादन इतिहास व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. अरुण घोडके यांनी केले. ते शिवानंदी फाउंडेशनच्या वतीने गुणवत्तांच्या गौरव सोहळ्यात बोलत होते. यावेळी उद्योजिका सोनाली सावंत, आई दुर्गा फौंडेशनच्या अध्यक्षा अश्विनी ढेंगे, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण, उद्योजक महेश भोसले, कोल्हापूर उत्पादन शुल्क विभागाचे पांडुरंग पाटील , पोलीस टाईम्स २४ संस्थापक डॉ. भारत देवळेकर, राष्ट्रवादी कोल्हापूर शहर अध्यक्ष अदील फरास, श्री स्वामी समर्थ
कॅटरिंगचे संस्थापक प्रशांत सावंत,
एस.पी.विद्यानिकेतचे संस्थापक आण्णासाहेब पाटील, सत्यमेव जयते संस्थेचे संस्थापक समीर पठाण, भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन सुदाम ईंगवले, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिवानंदी फाउंडेशनचे संस्थापक रमेश ईंगवले, एबीआरके फिल्मचे संस्थापक अभिषेक खोत यांनी केले. या कार्यक्रमात होम मिनिस्टर फेम मदन पलंगे यांना -कलाभूषण, सागर पाडळीकर-युवा उद्योजक, वकील स्वाती तानवडे, निकीता माने- युवा समाजरत्न, माऊली गावडे- कलारत्न, सुधाकर वायदंडे-समाजरत्न , विजय दळवी संस्थापक – आदर्श दूध संस्था, सागर जगताप- आदर्श पत्रकार, महादेव पाटील- उत्कृष्ट हलगी वादक, डॉ सुरज अवळेकर समाज, भूषण पुनम साळगावकर- समाजरत्न, प्रिंयका शिकेॅ-पाटील-कलारत्न, शाहीन बारगीर – समाजरत्न, सृष्टी पाटील- उत्कृष्ट निवेदिका, तेजस्विनी पाटील- खेलरत्न, जान्हवी इनामदार – कलारत्न, गायक संदीप देसाई – कलारत्न आदी विविध गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन पलंगे व सृष्टी पाटील यांनी केले