Salman Khan Marriage: लग्नाच्या प्रश्नावर सलमान खानचं शॉकिंग उत्तर, चाहतीने प्रपोज केल्यावर भाईजान म्हणाला….

0
82

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) बीटाऊनचा मोस्ट बॅचलर अभिनेता आहे. तसंच तो हँडसम अभिनेत्यांपैकी एक आहे. 90 च्या दशकापासूनच तो तरुणींच्या गळ्यात ताईत बनला. तरी सलमान खान आजही अविवाहित आहे.

त्याचं वैयक्तिक आयुष्य काही लपून राहिलेलं नाही. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. एकवेळ तर अशी होती की त्याचं लग्नही ठरलं होतं. मात्र अभिनेत्रीने लग्नाआधी नकार दिला. भाईजानने नुकतंच लग्नाच्या प्रश्नावर शॉकिंग उत्तर दिलं आहे. त्याच्या उत्तरानंतर सलमान खान आता लग्न करेल या आशाच मावळल्या आहेत.

58 वर्षीय सलमान खान लग्न कधी करणार? हा एक युनिव्हर्सल प्रश्नच होता. त्याला आजही तो जिथे जाईल तिथे हा प्रश्न विचारण्यात येतो. आता अभिनेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एक चाहती त्याला थेट प्रपोज करते. ती म्हणते, ‘मी हॉलिवूडवरुन आले आहे. तुला जेव्हापासून पाहिलंय मी तुझ्या प्रेमात पडले आहे.

माझ्याशी लग्न करशील का?’ तिच्या या प्रश्नावर आधी सलमान विचारतो, ‘तू शाहरुख खानबद्दल बोलतीये का? ‘ नंतर म्हणतो, “माझं लग्न करण्याचं वय आता उलटून गेलं आहे. तू मला 20 वर्षांपूर्वीच भेटायला हवी होतीस.” सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने व्हिडिओ इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here