तलाठी अमोल आनंदा जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…
प्रतिनिधी: मेघा पाटील
इचलकरंजी : आरोपी तलाठी अमोल आनंदा जाधव, वय ३९ वर्षे,कसबा इचलकरंजी, ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर,(वर्ग – ३) सद्या बाबासाहेब डोळे यांचे घरी भाडयाने यशवंत रेसिडेंसी,आरके नगर शहापूर इचलकरंजी,जि.कोल्हापूर येथे राहत आहेत. त्यांचे मूळ गाव रा. कोरवी गल्ली,आगर रोड,शिरोळ,ता.शिरोळ, जि.कोल्हापूर या ठिकाणचे मूळ रहिवासी आहेत.
तक्रारदार यांचे नातेवाईक यांना इचलकरंजी येथील रिसनं ४५२ क्षेत्र ०.०.९० आर इतकी मिळकत रजिस्टर बक्षीसपत्राने २०१९ मध्ये दिलेली आहे.सदर मिळकतीचे सात बारा पञकी नांव नोंद करणेसाठी तक्रारदार यांच्या बाजूने देणेसाठी आलोसे यांनी तडजोडीअंती स्वतः साठी 5,000/-₹ लाचेची मागणी करून4,000/-₹ लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.आरोपी यांचेविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरदार नाळे, पोलीस उप अधीक्षक यांनी ही कारवाई केली व आरोपीला रंगेहात पकडले. या सापळा पथक मध्ये आसमां मुल्ला, पोलीस निरीक्षक सपोफौ.प्रकाश भंडारे, पोहेकॉ अजय चव्हाण, पोहेकॉ सुधीर पाटील,पो.ना.सचिन पाटील,पोकॉ संदीप पवार,चा.पो.हे.कॉ. विष्णु गुरव,चा.पो.हे.कॉ सुरज अपराध या कारवाई दरम्यान हे पथक होते.