आपण किती जास्त आयुष्य जगणार आहोत हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. काही गोष्टी आपण आटोक्यात ठेवू शकतो तर काही गोष्टींवर आपला कंट्रोल नसतो. जसे की, आनुवांशिक आजार. तरीही लाइफस्टाईलमधील सवयी जसे की, आपला आहार, एक्सरसाइज इत्यादी आपलं एकंदर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
हृदयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी एक्सपर्ट तीन गोष्टी सांगितल्या आहेत. अमेरिकन डॉक्टर मोहम्मद अलो यांनी जास्त आयुष्य जगण्याचा मंत्र सांगितला आहे.
वजन नियंत्रणात ठेवा
लठ्ठपणा किंवा जास्त वजन वाढल्याने हृदयारोगाचा धोका वाढतो. डॉक्टर म्हणाले की, जेवढं शक्य होईल तेवढ आपलं वजन कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करा. नॅशनल हेल्थ सर्विसने इशारा दिला आहे की, जास्त वजन वाढल्याने अनेक आजारांचा धोका वाढतो. यामुळे टाइप 2 डायबिटीस, कोरोनरी हार्ट डिजीज, काही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात.
आहाराची काळजी
मेडिटेरेनियन डाएटला जास्त आयुष्य जगण्यासाठी फायदेशीर मानण्यात आलं आहे. डॉक्टर म्हणाले की, शक्य तेवढा मेडिटेरेनियन डाएटचा आधार घ्या. यात भरपूर भाज्या, फळं, शेंगा, कडधान्य आणि ऑलिव्ह ऑइलचा समावेश करा. यात प्रोसेस्ड फूडचं सेवन करू नका. ब्रिटिश हार्ट फाउंडेशनने सांगितलं की, मेडिटेरेनियन डाएटबाबत रिसर्चमधून समोर आलं की, टाइप 2 डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल या समस्या दूर केल्या जाऊ शकतात.
फिजिकल अॅक्टिविटी
डॉ. अलो म्हणाले की, तुम्ही अशा फिजिकल अॅक्टिविटी करा ज्या तुम्ही जास्त काळ फॉलो करू शकता. यात तुम्ही पायी चालणे, योगा, घरीच एक्सरसाइज या गोष्टींचा समावेश करू शकता.