
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
माध्यमिक विद्यालय, माळवाडी-कोतोली येथे सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले अनुभव, आठवणी आणि शाळेबद्दलची जिव्हाळ्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी पाटील म्हणाल्या,
“विद्यार्थ्यांनी या विद्यालयात घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर आज आयुष्यात स्थिरता आणि आनंद निर्माण केला आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून आपले जीवन अधिक आनंददायी आणि समृद्ध बनवावे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मानसिंग पाटील यांनी भूषवले. या वेळी संदीप वंजीरे, शिवाजी खापणे, वैभव साठे, विलास ऱ्हायकर आणि सुभाष लव्हटे हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुनिता चौगुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अजित पोवार यांनी मानले.
माजी विद्यार्थी म्हणून राहुल सुतार, दत्ता कांबळे, सुनिता चौगुले, अमित खोत, उमेश काळगावकर, लता पवार, शरद परीट, संकेत मोहिते आणि अजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
या स्नेहमेळाव्यामुळे माजी विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सलोखा आणि आत्मीयतेची भावना दृढ झाली.

