
कविन केंगनाळकरचे अभिनंदन!
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
विवेकानंद कॉलेज इयत्ता ११ वी चा प्रतिभावान पॅरा-शूटर कविन केंगनाळकर याने 10 मीटर एअर रायफल पॅरा-शूटिंगमध्ये सांघिक गटात पहिले आंतरराष्ट्रीय पदक जिंकून शहराचा अभिमान वाढवला आहे , हे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे! ही प्रतिष्ठित स्पर्धा अल ऐन, यूएई येथे आयोजित करण्यात आली होती जिथे 39 देश 290 नेमबाजानी सहभाग घेतला होता. कविनच्या अपवादात्मक कौशल्य आणि समर्पणामुळे त्याला व्यासपीठावर योग्य स्थान मिळाले आहे. कोल्हापूर आणि भारतासाठी अभिमानाचा क्षण!*
कविन ला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, संस्थेच्या सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे मॅडम, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे सर यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार सर, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव सर, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले सर, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के धनवडे व श्री सुरेश चरापले तसेच मुख्य प्रशिक्षक श्री जीवन राय आणि पॅरालिम्पिक असोसिएशनचे संचालक श्री जयप्रकाश नौटियाल यांचे मार्गदर्शन लाभले.*

