स्व. रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांची कुटुंबीयांना भेट“आपटे साहेबांचे सहकार क्षेत्रातील योगदान अमूल्य” — विश्वास पाटील

0
10

कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे –
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे माजी चेअरमन स्व. रवींद्र आपटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी जाऊन गोकुळचे जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी स्व. आपटे यांच्या पत्नी सौ. पद्मजा आपटे व चिरंजीव आदित्य आपटे उपस्थित होते. गोकुळ परिवाराच्या वतीने स्व. आपटे यांच्या स्मृतीस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

स्व. रवींद्र आपटे यांनी सहकार तत्त्वांवर आधारित संस्थांची उभारणी करून शेतकरीहितासाठी आयुष्य समर्पित केले. गोकुळ संघ बळकट करण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले, तर संघटनात्मक कामकाजात शेतकऱ्यांशी सखोल संवाद ठेवला. संचालक विश्वास पाटील आणि स्व. आपटे यांनी तब्बल ३२ वर्षे गोकुळ संचालक मंडळात एकत्र काम केले असून संघाच्या प्रगतीत दोघांचे योगदान अमूल्य ठरले आहे.

भावना व्यक्त करताना संचालक विश्वास पाटील म्हणाले,

“स्व. आपटे साहेबांनी सहकार क्षेत्रात साधेपणा, पारदर्शकता आणि शेतकरीहिताचा आदर्श निर्माण केला. गोकुळ मजबूत राहावे आणि शेतकऱ्यांचा विकास व्हावा, ही त्यांची अखेरपर्यंतची भूमिका होती. त्यांचे कार्यगौरव आणि आदर्श सदैव प्रेरणादायी राहतील.”

गोकुळ परिवाराने स्व. रवींद्र आपटे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या सहकार योगदानाचा गौरवपूर्वक उल्लेख केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here