
कोल्हापूर प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत केक कापून आनंदसोहळा
उद्योजक महेश उत्तुरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सेवा उपक्रम राबवून समाजसेवेचा संदेश देण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शिवसेना (ठाकरे गट) महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या हस्ते जेवण वाटप, फळांचे वितरण, तसेच आर्थिक मदत कार्यक्रम पार पडले.
विशेष म्हणजे, मातोश्री वृद्धाश्रमाचे थकीत वीजबिल भरून आश्रमास मदतीचा हात देण्यात आला — या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यक्रमास शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक विनायक फाळके, प्रताप जाधव, संजय जाधव, संग्राम निंबाळकर, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, सचिन पाटील, विशाल देवकुळे, रघुनाथ टिपुगडे, प्रमोद पाटील आदींसह विविध पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी राजारामपुरी परिसरातील तरुण मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्तुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
शेवटी मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत केक कापून वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यात आला.

