
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
फलटण गु.र.नं. ३४५/२०२५ प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई
फलटण शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ३४५/२०२५ या गुन्ह्यातील अटक आरोपी व निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.बदने याने पोलीस दलातील जबाबदारीची जाणीव असूनही बेफिकिरी, नैतिक अध:पतन, दुर्वर्तन आणि पदाचा दुरुपयोग केल्याचे समोर आले. त्याच्या कृत्यामुळे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली तसेच पोलीस उपनिरीक्षक पदाच्या सन्मानाला धक्का पोहोचविणारे आणि कर्तव्य पालनास अशोभनीय असे वर्तन केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेता, बदने याचे कृत्य अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय असल्याचे नमूद करत त्यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा निर्णय विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर
मा. श्री. सुनिल फुलारी यांनी भारतीय राज्यघटना कलम ३११(२)(ब) अन्वये घेतला असून, ही बडतर्फी दिनांक ०४ नोव्हेंबर २०२५ पासून प्रभावी करण्यात आली आहे.

