
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही स्टार प्रवाहवरील (Star Pravah) लोकप्रिय मालिका. २०१९ ला सुरु झालेली मालिका आजही TRP मध्ये टॉपवर आहे. आजही ७.३० वाजले की सहकुटुंब ही मालिका पाहिली जाते.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील सर्व कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. पण ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी. तब्बल ४ वर्षांनी ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे.
‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी चर्चा आहे. या मालिकेच्या जागी ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. नुकतंच ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेची वेळ समोर आलीय. ही मालिका १८ मार्च पासून रात्री ७.३० वाजता स्टार प्रवाहवर टेलिकास्ट होणार आहे. यामुळे गेली ४ वर्ष साडे सातला प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.


