
कोल्हापूर प्रतिनिधी:पांडुरंग फिरिंगे
अवैध गुटख्याचा मोठा साठा जप्त — 1 लाख 71 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल जप्त
मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने इचलकरंजी येथे धडक कारवाई करत अवैध गुटख्याचा मोठा साठा जप्त केला आहे.
पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इचलकरंजीतील इंदिरानगर, गल्ली नं. ३ येथील वसीम यूनुस तांबोळी (वय २९) याच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान पान मसाला, सुगंधी तंबाखू, सुपारी आणि सुगंधी जर्दा असा एकूण ₹1,71,710 किंमतीचा अवैध गुटखा साठा आढळून आला.
सदर मुद्देमाल जप्त करून आरोपी वसीम तांबोळी यास इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार गुप्ता व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगले, संतोष बरगे, राजू कोरे व सागर चौगले यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
🔹 अवैध धंद्यांवर पोलिसांचा धडाकेबाज बंदोबस्त — “गुटखा माफियांचा कोल्हापूर जिल्ह्यात पाय रोवू देणार नाही,” असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

