
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोल्हापूर ते राजापूर या मार्गावरून कोतोली-नांदगाव मार्गे प्रथमच एस.टी. बससेवा सुरू झाल्याने परिसरातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या नवीन सेवेच्या प्रारंभानिमित्त ठाकरे पान शॉप (नांदगाव) आणि श्रीराम हॉटेल (नांदगाव) यांच्या वतीने एस.टी. बसचे चालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत एमएसआरटीसी प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या नव्या मार्गामुळे कोतोली, नांदगाव परिसरातील नागरिकांना कोल्हापूर व राजापूर दरम्यान प्रवासासाठी सोयीस्कर, सुरक्षित व किफायतशीर सुविधा उपलब्ध झाली आहे.
कार्यक्रमावेळी उपस्थितांनी या उपक्रमाचे अभिनंदन करत “ग्रामीण भागाशी जोडणारी ही सेवा म्हणजे विकासाचा नवा टप्पा” असे मत व्यक्त केले.
स्थानिक व्यापारी, प्रवासी व नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

