पोलिसांना हाताशी धरुन खाकी वर्दी घालून जवानाची दहशत.. गिरीगोसावी कुटुंबाचा केला संसार उध्वस्त…

0
269

23 ऑगस्ट 2023 कराड: ( जिल्हा सातारा) कराड तालुक्यांतील जुळेवाडी येथील भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे परशुराम मधुकर देशमुख यांनी जुन्या जागेच्या वादांतून खाकी वर्दी घालून (ता.कराड) जुळेवाडी येथील श्री सिताराम गिरीगोसावी कुटुंबावर दहशत माजवत त्यांचा संसार केला उध्वस्त… देशांचे रक्षण करणारा जवान परशुराम मधुकर देशमुख यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली चांगलीच दहशत माजवत. जुन्या जागेच्या वादांतून परशुराम देशमुख या जवानाने गिरी गोसावी कुटुंबाचा संसार उध्वस्त केला. त्यांचे घर व दफनभूमीची जागा देखील जेसीपीच्या साह्याने उध्वस्त केली. या घटनेमध्ये कराड तालुका पोलीस ठाण्यांतील दोन कर्मचाऱ्यांनी देखील सिताराम गिरी यांच्या कुटुंबाला धक्काबुक्की करीत मारहाण देखील केली आहे. या जवानाची दहशत पाहून सिताराम गिरी यांच्या पत्नीना अचानक चक्रारने त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर मुलीची देखील प्रकृती चांगलीच बिघडली आहे. त्यामुळे एका देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांने पोलिसांना हाताशी धरुन जुन्या जागेच्या वादांतून गिरी गोसावी कुटुंबावर चांगलाच अन्याय केला आहे. मात्र यामध्ये पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कराड तालुका पोलिसांच्या अशा प्रवृत्ती मुळे कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. असा आरोप गिरी कुटुंबाकडूंन करण्यात आला आहे. यामध्ये गिरी कुटुंबाची आता मागणी जोर धरु लागली आहे त्यांनी थेट आता मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांना या प्रकरणातील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अमोल ठाकूर यांच्यासह कराड तालुका पोलिस ठाण्यांतील दोन कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा अशी मागणी गिरी कुटुंबांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here