हमीभाव तर मिळेनाच; लागवडीचा खर्चही वसूल होईना!

0
146

कापसाचा उत्पादन खर्च वाढला असताना सरासरी उत्पादनामध्ये घट झाली आहे. यावर्षी कापसाचा हमीभाव ७०२० रुपये प्रतिक्विंटल जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र तालुक्यात शासनाचे खरेदी केंद्र सुरू नाहीत.

त्यामुळे कापसाला ५८०० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामध्ये उत्पादन खर्च पदरी पडत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यावर्षी कधी नव्हे पावसाला विलंब झाला. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यांमध्ये पुन्हा खंड पडला.

शेतकऱ्यांनी कशीबशी पेरणी केली. त्यानंतर पिके उगवली, परंतु त्यानंतर बोंडअळी व इतर रोगांचा प्रादुर्भाव कापूस, सोयाबीन व इतर पिकांवर पाहायला मिळाला. यात कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय नोव्हेंबरअखेर झालेल्या पावसाने शेतात फुटलेला कापूस बोंडातच भिजला गेला. त्यामुळे कापसाची प्रतवारी खराब झाली. परिणामी, व्यापाऱ्यांनी कापसाची कमी भावाने खरेदी करणे सुरू केले. अशातच दोन-तीन वेचण्यांमध्ये कापसाची पहाटी झाली, या सर्व प्रकारात सरासरी उत्पादनात कमी आले.

दोन वर्षात पहिल्यांदाच कमी भाव

खरे पाहिले तर कापसाला हमीभाव पाहिजे. परंतु कापसाला हमीभावही मिळत नाही. त्यामुळे शेतकयांचे बजेट कोलमडले आहे. रुई, सरकीचे दर कमी आल्याने कापसाचे भाव कमी आले आहेत. नाही दोन वर्षांत पहिल्यांदा कापसाला कमी भाव मिळाला आहे. दोन वर्षापूर्वी कापसाला आतापर्यंतचा उच्चाकी १० हजार ते १२ हजार रुपये क्चिटलपर्यंत भाव मिळाला होता, यंदा मात्र कापसाच्या दराने शेतकऱ्यांची निराशा केली आहे.

‘सीसीआय’चे खरेदी केंद्रही सुरु नाही

दरवर्षी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र तालुक्यात सुरू असते. यंदा सीसीआय’चे खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी देखील करण्यात आली. परंतु अद्याप स्वरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे मिळेल त्या दरात शेतकरी कापूस विकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसत आहे.

जिनिंग मालकांनी तरी हमीदराने कापूस खरेदी करावा

वसमत व औंढा नागनाथ तालुक्यांत दोन खासगी कापूस जिनिंग सुरू आहेत. या ठिकाणी हमीभायापेक्षा कमी दराने कापसाची खरेदी सुरू आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देऊन शेतकयांचा कापूस किमान हमीभावाने घ्यावा, अशी मागणी होत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या मागणीकडे कोणीही लक्ष देत नाही, असे दिसते.- बालाजी दळवी, शेतकरी

वजन काट्याचीही तपासणी व्हावी…

शेतकरी वर्षभर घाम गाळून शेतात पिके पिकवतो, परंतु पिकांना म्हणावा तसा भाव मिळत नाही. दुसरीकडे काही फाट्यावर वजन कमी होत आहे. अशावेळी तपासणी होणे गरजेचे आहे. परंतु काट्यांची तपासणी होत नाही. तेव्हा अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

केंद्राबाबत खरेदी-विक्री संघाने ठराव घेतला आहे

सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, यासाठी खरेदी-विक्री संघाने ठराव घेत मागणी केली आहे. परंतु अद्यापपर्यंत सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात परवानगी मिळाली नाही.-सागर इंगोले, सचिव, खरेदी-विक्री संघ, वसमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here