आगे आगे देखो होता है क्या! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक वक्तव्य

0
184

सर्वच पक्षांचे चांगले आणि बडे नेते आमच्या संपर्कात असून आगे आगे दोखो होता है क्या…,असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या दोन माजी नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केला.

वाँर्ड क्र 82 मध्ये दोन टर्म काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि उत्तर मध्य जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक जगदीश कुट्टी अमिन आणि वाँर्ड क्र 216 चे माजी नगरसेवक राजेंद्र नरवणकर यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्यासह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अँड.पराग अळवणी, प्रसाद लाड, भालचंद्र शिरसाट, अमरजीत मिश्र आणि माजी नगरसेवक मुरजी पटेल आदी यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत हा प्रवेश झाला.

मुंबईकडे काही जण सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहत होते. मुंबईसाठी काहीच केले नाही. तर कोविडमध्ये जेव्हा मुंबईकर उपचारासाठी धडपड होते तेव्हा हे लोक भ्रष्टाचार करीत होते.

मृतांच्या ताळूवरचे लोणी खाणे म्हणजे काय हे यांनी दाखवून दिले आहे. अशा भ्रष्टाचारातून मुंबईकरांची सुटका करुन जेव्हा निवडणूक होईल तेव्हा भाजपा महायुतीचा विजय निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करीत देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रवेश केलेल्या दोन्ही माजी नगरसेवकांचे स्वागत केले. दरम्यान, ज्यांचा जनतेशी कनेक्ट आहे असे अनेक मोठे नेते भाजपाच्या संपर्कात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास यात्रेत सहभागी होण्यास इच्छुक आहेत. आगे आगे देखो होता है क्या.. असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here