
प्रतिनिधी: स्नेहल घरपणकर
कोल्हापूर येथे सरोजिनी बहुउद्देशीय सामाजिक संस्था म्हणून बरेच वर्षे झाली कार्यरत आहे.दिनांक 14 फेब्रुवारी 2023 रोजी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा वर्धापन दिन साजरा होणार आहे.सरोजिनी मंच चा पाचवा वर्धापन दिन विविध कला स्पर्धा व विशेष कार्य कौतुक सोहळा समारंभ संपन्न होणार आहे असे संस्थापिका अध्यक्षा व आयोजक सुनिता हनिमनाळे यांनी पत्रकारद्वारे प्रसिद्ध केले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्री वसंत भोसले दैनिक लोकमत संपादक, डॉ. रेश्मा पवार कोल्हापूर कॅन्सर सेंटर सीईओ, श्री राजेंद्र बंडोपंत तामगावकर असिस्टंट डिव्हिजन मॅनेजर एलआयसी, मीरा राजपूत समाजसेविका, अशोक विष्णू शिंदे डेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअरडेप्युटी एक्झिक्यूटिव्ह इंजिनियर एमएसईबी, सुरेखा कांबळे अध्यक्ष सक्षम फाउंडेशन कोल्हापूर, विजयसिंह भोसले महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळ कोल्हापूर, सागर शिवाजी पाटील मॅनेजिंग डायरेक्टर SP-9 मराठी माध्यम समूह आणि इतर मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.कार्यक्रमाचे ठिकाण विद्याभवन विक्रम हायस्कूल शेजारी शिवाजी पार्क कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.

