संजय पाटील यांची शिवसेना (शिंदे गट )उप जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती

0
255



कोल्हापूर/ दिनांक 12 फेब्रुवारी 2024

प्रतिनिधी : स्नेहल घरपणकर


आपल्या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्याला स्टार आंदोलक या नावाने परिचित असणारे परिवर्तन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जनसुराज्य शक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री संजय पाटील यांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख श्री सूचित चव्हाण यांनी केली. त्यांना सर्किट हाऊस येतील शाहू सभागृह येथे त्यांच्या शेकडो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आले .संजय पाटील यांनी गेल्या वीस वर्षात कामगार ,कष्टकरी, शेतकरी ,वंचित ,रेशन ग्राहक यांच्यासह जनसामान्यांच्या प्रश्नांवर लक्षवेधी 500 हून अधिक आंदोलने केलेले आहेत. यावेळी राजेश क्षीरसागर म्हणाले संजय पाटील यांच्यासारखा रस्त्यावरची लढाई लढणारा एक लढवय्या आंदोलक पक्षाला मिळाल्यामुळे पक्षाचे बळ वाढणार असून भविष्यात त्यांना मोठी संधी प्राप्त होईल त्याचबरोबर पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत .यावेळी जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण म्हणाले ,संजय पाटील यांनी काळाबाजार, भ्रष्टाचार याविरोधात जीवावर बेतलेली टोकाची लढाई लढलेली आहे .त्यांचा आक्रमकपणा आणि प्रशासनावरील वचक यामुळे जनसामान्यांचे प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे
यावेळी महानगर प्रमुख शिवाजी जाधव, उत्तर शहर प्रमुख रणजीत जाधव ,माजी नगरसेवक नंदकुमार मोरे ,माजी नगरसेवक अमोल माने, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, नियोजन मंडळ सदस्य अंकुश निपाणीकर, दक्षिण शहर प्रमुख महेंद्र घाडगे, किशोर घाडगे, सुनील जाधव, मंदार तपकिरे ,क्षितिज जाधव ,अनिल कवाळे ,साईराज पाटील ,साताप्पा कांबळे, तानाजी मोरे, महिला प्रमुख मंगल ताई साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने शाहू सभागृह येथे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here