
पुरस्कारामुळे विधायक कार्यास प्रेरणा मिळते : प्रा.अरुण घोडके
कोल्हापूर/ प्रतिनिधी
पुरस्कारामुळे विधायक कार्यास प्रेरणा मिळते असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते प्रा.अरुण घोडके यांनी केले. ते कोल्हापूर येथे ए.सी भारत सरकार यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण आणि गार्गीज डीआयडी फाउंडेशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उपअधीक्षक सदानंद सदांशिव, एस.पी9 न्यूज चॅनल चे संपादक डॉ. सुरेश राठोड, नोटरी विभागाच्या ॲड. सविता कर्णिक यांची प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी वृक्षास पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रा.घोडके म्हणाले, समाजामध्ये काम करत असताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम केले पाहिजे. विधायक कार्यामुळे समाजभान जपले जाते. पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतून चांगल्या कार्यास गती मिळते.
माणसाने गरुड पक्षाप्रमाणे जगले पाहिजे.
यानंतर डॉ. राठोड यांनी गार्गीस डी आय डी फाउंडेशन च्या कार्याला 21000 ची मदत करत म्हणाले, यांचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. अशा कार्याला सर्वांनी पुढे येऊन मदत करावी.
आम्ही एस पी9 न्यूज चॅनल चे डायरेक्टर सागर पाटील व आम्ही सर्व संपादक नेहमीच अशा कार्याला मदत करत असतो. याप्रसंगी कुस्ती क्षेत्रातील वस्ताद वसंतराव पाटील( मिरा भाईंदर ), आयुर्वेदिक क्षेत्रातील डॉ. नंदकुमार पाटील (चिंचोली), समाजसेवक डॉ. राजेंद्र ननावरे (मुंबई), सौ. यशश्री अश्वरत्न (कोल्हापूर) यांना ‘ भारत भूषण’ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात हलगी सम्राट मारुती मोरे यांच्या ग्रुपने हलगी वादन, विक्रांत सोनवणे यांच्या ग्रुपने शिवशंभू मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, गार्गीज डीआयडी फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी ग्रुप डान्स, सलिम शेख यांनी बहारदार लावणी, लहान मुलांच्या ग्रुपने ग्रुप डान्स करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांचे स्वागत ए.सी भारत सरकारचे कोल्हापूर विभाग प्रमुख डॉ. मॅडी तामगावकर, डीआयडी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा मृणालिनी चव्हाण, सचिव सारिका भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार प्रतापराव शिंदे, हलगी सम्राट मारुती मोरे, ओमकार माने, अक्षय भोरे, अनिल कांबळे, सलिम शेख व पोलीस मित्र आदींचा सत्कार करण्यात आला.


