अनेक महिन्यांपासून अभिनेत्री जयाप्रदाचा यांचा पोलिस घेतायत शोध; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0
103

 अभिनेत्री आणि रामपूरच्या माजी खासदार जया प्रदा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी त्या त्यांच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतात तर कधी त्या त्यांच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतात.

मात्र आता त्यांच्याविषयी एक मोठी बातमी समोर येत आहे जी ऐकून त्यांच्या चाहत्यांनादेखील धक्का बसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूर पोलिस बऱ्याच दिवसांपासून शोधात आहेत. रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टाने अभिनेत्रीच्या विरोधात अजामीनपात्र वारंट जारी करण्यात आले आहे. ७ व्यांदा पोलिसांनी अभिनेत्रीच्या विरोधात वॉरंट जारी केला आहे. पोलिस त्यांचा राज्यात तर शोध करतच आहेत पण त्याचबरोबर इतर भागातही त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या या प्रकरणात अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही.

अभिनेत्री जयाप्रदा विरोधात रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टात दोन केस चालू आहेत. यामधील एक केस केमरी येथे तर दुसरी केस स्वार पोलीस ठाण्यात सुरू आहे. दोन्ही केस लोकसभा निवडणूक २०१९ मधील आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित आहेत. या प्रकरणातील खटला कोर्टात प्रलंबित आहेत. कारण जया कोर्टात हजर होत नसल्याने त्यांच्या विरोधात आता ७ व्यांदा एनबीडब्लू (अजामीनपात्र वारंट) जारी करण्यात आला आहे. यानंतरही त्या कोर्टात हजर राहिल्या नाही.

२७ फेब्रुवारीला होणार सुनावणी
रामपूर कोर्टाने एसपीला कडक आदेश दिले आहेत. आदेशामध्ये जयाप्रदा यांना कोर्टात हजर करण्याविषयी सांगितलं आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांना अभिनेत्रीच लोकेशनही समजू शकत नाहीये. अशामध्ये कोर्टने पुन्हा एकदा एनबीडब्ल्यू जारी केलं आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ फेब्रुवारीला होणार आहे.

जयाप्रदा यांच्यावर आहेत आरोप
जयाप्रदा यांच्यावर २०१९ साली लोकसभा निवडणुकीत आरोप झाले होते. जयाप्रदा भाजपच्याच्या तिकीटावर रामपूरची सीट लढवत होत्या. यादरम्यान त्यांच्या विरोधात पहिला गुन्हा स्वार ठाण्यात दाखल करण्यात आला. ज्यामध्ये आरोप आहे की, आचार संहिता लागू असतानाही नूरपुर गावात रस्त्याचं उद्धाटन केलं गेलं. याशिवाय दुसरा गुन्हा केमरी ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोप आहे की, जयाप्रदा यांनी पिपलिया गावात आयोजित केलेली जनसभेत आपत्तिजनक टिप्पणी केली होती. दोन्ही प्रकरणाची एमपी-एमएलए कोर्टात सुनावणी सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here