सोशल मीडियावर नेहमीच ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात. जे सगळ्यांनाच बघायला आणि त्यातील रहस्य उलगडण्यात मजा येते. यातील फोटोंमध्ये काही शोधायचं असतं किंवा त्यातील चुका शोधायच्या.
पण हे वाटतं तेवढं सोपं काम नसतं. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमच्याकडे तीक्ष्ण डोळेही असायला हवेत. या फोटोंच्या माध्यमातून तुमच्या मेंदुची आणि डोळ्यांची टेस्टही केली जाते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
सामान्यपणे ऑप्टिकल इल्यूजन फोटोंचा वापर आपला दृष्टीकोन आणि डोळ्यांची तीक्ष्णता चेक करण्यासाठी केला जातो. तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक जंगल आणि जंगलातील एक झाड दिसत आहे. तसं दिसायला हे एक सामान्य झाड आहे, पण या झाडावर तीन घुबड बसले आहेत. तेच तुम्हाला शोधायचे आहेत. त्यांना शोधण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
या फोटोतील घुबड झाडाच्या रंगासोबत मिक्स झाले आहेत. त्यामुळे ते सहजपणे दिसत नाही. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे हवेत. जर तुम्ही यातील घुबड शोधले तर तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं समजा. जर तुम्हाला यातील घुबडं दिसले नसतील तरीही चिंतेची बाब नाही.
या फोटोतील घुबडं तुम्ही शोधले असतील तर तुम्ही जीनिअस आहात, पण जर अजूनही तुम्हाला दिसले नसतील तर निराश होऊ नका. यात आम्ही तुमची मदत करू. या फोटोतील घुबडं कुठे आहेत हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता. ते इतक्या हुशारीने लपवण्यात आले आहेत की, तुम्ही ते सहज शोधू शकणार नाहीत. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल.