पुणे आणि चिचंवडमधील कॅब चालकांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 20 फेब्रुवारीपासून शहरातील ओला उबेरची सेवा बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॅब चालकांकडून पुणे येथील आरटीओ ऑफिस येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. 20 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या कामबंद आंदोलनात शहरातील जवळपास 20 हजारांहून अधिक कॅबचालक सहभागी होणार, असा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे. (Pune Ola Uber Services Ola Uber off in Pune from February 20 This is because)
जवळपास 20 हजार कॅब चालक आंदोलनात सहभागी
प्रादेशिक परिवहन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी कॅब कंपन्यांसाठी दर पत्रक जाहीर केले. 1 जानेवारी 2024 पासून नवीन दर लागू झाले आहेत.
मात्र आलो उबेरयासरख्या कंपन्या प्रत्यक्षात त्या दराची अद्याप अंमलबजावणी करत नाही. परिणामी याचा फटका कॅब चालकांना बसत आहे. नवीन दर लागू झाल्यास कॅब चालकांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ होईल, आणि वाढीव दराचा व्यवसायावर परिणाम होईल.
या भीतीने कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी अद्याप दराची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संगम ब्रिजजवळ आरटीओ कार्यालयासमोर कॅब चालक एकत्रित येतील, असं निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात सुमारे 20 हजार कॅब चालक सहभागी होणार असल्याचा दावा डॉ. केशव क्षीरसागर यांनी केला आहे.