काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसी समाजात झाला नसल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे. तसेच काॅंग्रेस ओबीसीत फूट पाडत आहे, असा आरोप करत भाजपने साताऱ्यात राहुल गांधी विरोधात निषेध नोंदवला.
यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
साताऱ्यातील पोवई नाक्यावर भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भारत जंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली निषेध आंदोलन झाले. यावेळी शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, संतोष कणसे, मनीषा पांडे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संग्राम बर्गे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, ओबीसी मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा गौरी गुरव, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस अॅड. रूपाली पाटील-बंडगर, सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष पंकज चव्हाण, कऱ्हाड उत्तर मंडल अध्यक्ष शंकर शेजवळ, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, आप्पा कोरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत आंबेकर आदी उपस्थित होते.
भाजप ओबीसी माेर्चाचे जिल्हाध्यक्ष जंत्रे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म ओबीसीत झालेला नाही. सामान्य जातीत जन्म झाला आहे, असे चुकीचे वक्तव्य खासदार राहुल गांधी यांनी ओरिसातील सभेत काढले आहे. राहुल गांधी यांचा हा उद्दामपणा म्हणजे समस्त ओबीसी समजाचा अपमान आहे.
शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी काँग्रेस नेहमीच ओबीसी आरक्षणाविरोधात राहिली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू यांनीही १९५३-५४ मध्ये काकासाहेब कालेलकर आयोगाने केलेल्या शिफारशींना विरोध केला होता. तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनीही मंडल आयोगाला विरोध केलेला. पुन्हा एकदा गांधी परिवार ओबीसी विरोधात षडयंत्र रचत आहे. हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा दिला.
या निषेध आंदोलनात युवराज मोरकर, किशोर पंडित, रवी लाहोटी, फत्तेसिंह पाटणकर, सुनील भोसले, अमोल कांबळे, सनी साबळे, सुनील लाड, इम्तियाज बागवान, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, नितीन कदम, वैशाली टंगसाळे, चित्रा माने, हेमांगी जोशी, प्रिया नाईक, वनिता पवार, अश्विनी हुबळीकर, हेमलता पोरे, सुरेखा धोत्रे, विकास बनकर, मनोहर कदम, सागर पवार, संतोष कदम, अमोल माने, लिंबाजी सावंत, विनोद देशपांडे, दिलीप शेवाळे, आशिष सकुंडे, अमित भिसे, निवास अडसुळे, रोहित किर्दत, अक्षय भोसले, जयराज मोरे, सचिन साळुंखे, रविकिरण पोळ, महेंद्र कदम, यशराज माने, गौरव मोरे, विजय पोरे, प्रथमेश इनामदार, सुहास चक्के, दिगंबर वास्के, शैलेश संकपाळ, अंकुश लोहार, अमित काळे, पंकज खुडे, राहुल चौगुले आदी सहभागी झाले होते.