मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही’ : एस.टी.कामगार संघटनेचा इशारा

0
123

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.

कोल्हापूर : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्यावतीनं एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामधील विसंगती दूर करण्यात याव्यात, घर भाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा भत्ता यांची थकबाकी तातडीनं मिळावी यासह इतर मागण्यांसाठी आज मंगळवार दि १३ फेब्रुवारी पासून एस.टी.च्या विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. आमच्या मागण्यांबाबत आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जोपर्यंत आमच्या मागण्याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here