Health Tips In Marathi: रात्रीचे जेवण फक्त जेवण नसून उद्याच्या दिवसभरासाठी उर्जा देते. यामुळं शरीरात उर्जा टिकून राहते. त्याचबरोबर पोषणदेखील मिळते. मात्र, रात्री तुम्ही जेवणात काय खाता व कस आहार घेता यावर हे सर्व अलवंबून असते.
त्यामुळं रात्रीच्या जेवणात जर तुम्ही काही चुकी करत असाल तर आत्ताच सावध व्हा. कारण या चुकांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
इन्स्टाग्रामवरील एका रीलमध्ये आयुर्वेदिक आणि आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर डिंपल यांनी रात्रीच्या जेवणात साधारणतः होणाऱ्या चुकांबाबत सांगितले आहे. तसंच, या तीन चुका टाळा नाहीतर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळं तुम्ही तुमचं डिनरचा आनंदही घेऊ शकता आणि तुमचं आरोग्यही बिघडणार नाही.
पहिली चुकः जेवणाच्या वेळी फळे खाणे
फळे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातील अँटीऑक्सिडेंट्स हे आपले शरीर हेल्दी ठेवण्यास मदत करतात. मात्र, जेवणात जर तुम्ही फक्त फळे खात असाल तर ही तुमची खूप मोठी चुक आहे. तज्ज्ञांच्या मते, फळांमध्ये अॅक्टिव्ह एंजाइम असतात. ज्यामुळं ते शरीरात कॉफीप्रमाणे काम करतात. तसंच, त्याचा परिणाम झोपेवर होतो. तसंच, शरीरातील ग्लुकोजची लेव्हलदेखील वाढवते. त्यामुळं फळ नेहमी संध्याकाळी किंवा सकाळी खाणे चांगले आहे.
दुसरी चुकः स्टार्ची,फ्राइड फुड्स खाणे
जर तुम्ही डिनरमध्ये स्चार्च व कार्ब्स असलेले पदार्थ खाता जसे की, पिझ्झा, पास्ता, फ्रेंच फ्राइज किंवा बटाटे. या पदार्थांमुळं ब्लड शुगर लेव्हल वाढवण्याबरोबरच फूड क्रेव्हिंग वाढवण्याचे काम करते. त्याचबरोबर फ्राइड फुडच्या मुळं जेवण व्यवस्थित पचतदेखील नाही.
तिसरी चुकः सलाडमध्ये कॉम्प्लेक्स क्रूसिफेरस भाज्या
रात्रीच्या जेवणात जर तुम्ही सलाड खात असाल तर कॉम्प्लेक्स क्रूसिफेरस भाज्या म्हणजेच ब्रोकली, कोबी, फ्लोवर सारख्या भाज्यांचा समावेश करु नका. कारण या भाज्यांचे पचन होण्यास खूप वेळ लागतो. यामुळं गॅस आणि ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
रात्रीच्या जेवणात काय खावे?
रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूपसारखे पर्याय घ्या. कारणे हे पौष्टिक तर असते पण शरीराला आवश्यक असलेले पोषणदेखील पुरवते. यासाठी तुम्ही जेवणात गाजर, बीटरुट, पालक यासारखे सूप घेऊ शकता. जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता कमी असेल तर हे सूप प्या. तसंच, तुमच्या शरीरात फॅटची कमतरता असेल तर भोपळ्याचे सूप प्या. वजन कमी करायचे असेल तर मिलेट खिचडी किंवा डाळ-भात किंवा भाजी-भात खाऊ शकता. कारण हे हेल्दी तर असते पण त्याचबरोबर तुमच्या क्रेव्हिंग शांत करण्यासही मदत करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या