Sp9/कोकरूड प्रतिनिधी
डालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज शुगर युनिट श्री निनाईदेवी कारखान्याचे युनिट हेड संतोष जयकुमार कुंभार यांनी साखर उद्योगात दिलेल्या विशेष योगदानाबद्दल भारतीय शुगर या राष्ट्रीय साखर उद्योगात काम करणाऱ्या संस्थेकडून ‘ बेस्ट इंडस्ट्री एक्सलन्स ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय पुरस्काराने कोल्हापूर
येथील हाॅटेल सयाजी येथे श्री दत्त इंडियचे संचालक जितेंद्र धारू, भारतीय शुगर चे संचालक विक्रमसिंह शिंदे, एन. एस. आयचे संचालक डॉ. नरेंद्र मोहन आगरवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी संतोष कुंभार, त्यांच्या मातोश्री पार्वती कुंभार व पत्नी जयश्रीताई कुंभार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संपूर्ण भारतामध्ये सहकारी व खाजगी असे सुमारे 530 साखर कारखाने कार्यरत आहेत .
त्यासर्वांमधून संतोष कुंभार यांची निवड झाली आहे. डालमिया भारतचे युनिट हेड संतोष कुंभार हे रसायनशास्त्रातील पदवीधर असून त्यांनी या अगोदर कर्मयोगी इंदापूर, रेणुका शुगर, ओलम शुगर, सिद्धेश्वर साखर कारखाना सोलापूर, बारामती ॲग्रो ,पिकॅडल्ली शुगर हरियाणा, येथे चांगल्या पद्धतीने काम केले आहे. सध्या ते शिराळा तालुक्यातील डालमिया भारत शुगर युनिट, श्री निनाईदेवी करुंगली – आरळा येथील कारखान्याचे युनिट हेड म्हणून आदर्शवतपणे काम पाहत आहेत. संतोष कुंभार यांनी साखर उद्योगात तसेच ऊस उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रम राबवून ते यशस्वी केले आहेत . याचीच दखल घेऊन त्यांना ‘ बेस्ट इंडस्ट्री एक्सलन्स ऑफ द इयर ‘हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सांगली जिल्ह्यातून विशेष अभिनंदन होत आहे.