प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
किसान आंदोलन कर्त्याच्या मागण्या मान्य होत नसल्याने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. भारतीय किसान युनियनने आज १५ फेब्रुवारी २०२४ संपूर्ण पंजाबात रेल्वे रोखण्याची घोषणा केली आहे तर केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने उद्या १६ फेब्रुवारी रोजी ग्रामीण भारत बंदचे आवाहन केल आहे.
या बंदला कामगार संघटनांनी पाठिंबा दिला असून, महाराष्ट्र राज्यात सर्वत्र रास्ता रोको, मोर्चा, बंद करुन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी पत्राद्वारे दिली आहे.