मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनय आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या अभिनेत्री सीमा देव यांचं निधन

0
396

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

गेल्या काही दिवसांपासून त्या अल्जायमर या आजाराने पिडीत होत्या. दीर्घकाळ आजारी असल्याने त्यांचं निधन झालं.
वयाच्या 81 च्या वर्षी सीमाजींनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. दोघांनी अनेक चित्रपटात पती-पत्नीची भूमीका केली आहे.

यापैकी ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित आनंद हा चित्रपट आजही चाहत्यांच्या लक्षात आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता आजिंक्य देव आणि डेली बेली फेम दिग्दर्शक अभिनव देव यांच्या त्या आई होत्या.
रमेश देव यांनी 1950 मध्ये मराठी चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.

त्यांनी काही हिंदी चित्रपटात सह कलाकाराच्या भूमिकेत काम केले. त्यांची चित्रपट कारकिर्दी बहरत असताना दुसऱ्या बाजूला नलिनी सराफ यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

चित्रपटासाठी त्यांनी सीमा या नावाने कारकिर्दीला सुरुवात केली 1960 मध्ये ‘जगाच्या पाठीवर’ या मराठी चित्रपटातून या जोडीनं एकत्र काम केले. हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय ठरला होत

1962 मध्ये त्यांनी ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात ही जोडी पुन्हा झळकली. या चित्रपटापासूनच दोघांच्या नात्यातील प्रेम फुलण्यास सुरुवात झाली. त्याच वर्षी अभिनय क्षेत्रातील नावजलेली जोडीनं विवाहही थाटला.

2013 मध्ये या जोडीच्या विवाहाला 50 वर्षे पूर्ण झाली होती. 50 वर्षानंतरही त्यांच्या नात्यातील गोडवा एखाद्याला हेवा वाटावा असाच होता. रमेश देव यांनी 280 हून अधिक चित्रपटात काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here