Kolhapur: आयुष्याची चिंता सतावणाऱ्या विद्यार्थ्याने संपवले जीवन, इंग्रजीत पानभर लिहिली सुसाईड नोट

0
117

कोल्हापूर : आर्थिक परिस्थितीमुळे भविष्यातील आयुष्याची चिंता सतावणाऱ्या डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या नीरज विकास सरगडे (वय २३) या विद्यार्थ्याने रविवारी दुपारी सुधाकरनगरातील राहत्या फ्लॅटमध्ये फरशी कापण्याच्या ग्राईंंडर मशीनच्या साहाय्याने गळा कापून घेऊन आत्महत्या केली.

नीरज सरगडे हा आपल्या आई आणि आजोबासोबत आईच्या माहेरी सुधाकरनगर येथील बागेश्री अपार्टमेंटमध्ये राहात होता. मृतदेहाजवळ सापडलेल्या चिठ्ठीमुळे अभियांत्रिकीचे डिप्लोमाचे शिक्षण तो घेत होता. आपल्या भविष्याबद्दल तो सातत्याने चिंता करत होता. शिक्षण पूर्ण होण्यासाठी लागणारी रक्कम, लग्नासाठी लागणारी रक्कम, मुलाबाळांचा खर्च अशा भविष्यातील खर्चाची तरतूद आपण करू शकणार नाही या चिंतेने ग्रासलेल्या नीरजने रविवारी आत्महत्या केली. हा प्रकार रात्री ७ ते ७:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

परिसरातील नागरिकांना ग्राईंडर मशीनचा आवाज सातत्याने येत असल्यामुळे त्यांच्या अपार्टमेंटमधील फ्लॅटकडे धाव घेतली असता फ्लॅट बंद आढळला. त्यांनी संपूर्ण अपार्टमेंटची वीज बंद केली. त्यानंतर हाका मारूनही कोणी दार उघडत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मागच्या बाजूने जाऊन फ्लॅटमध्ये प्रवेश केला असता नीरज बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळला.

चिठ्ठीत भविष्याची चिंता

मृतदेहाजवळ सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये नीरजने इंग्रजीत पानभर भविष्याची चिंता व्यक्त करून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. नीरजची आई आपल्या माहेरी नीरजच्या आजोबांजवळ राहात होती. तो एकुलता असून रविवारी त्याची आई कऱ्हाड येथे गेली होती. नीरजने दुपारी कॉलेजला जाऊन आल्यानंतर घरी गेला आणि दार लावून घेऊन आत्महत्या केली.

ग्राईंडर मशीन नव्याने विकत घेतले..

नीरजने ग्राईंडर मशीन नव्याने विकत घेतल्याचे आढळून आले. मृतदेहाजवळच त्या मशीनचे कव्हर आढळून आले. मशीनचा आवाज ऐकायला येऊ नये आणि रक्त उडू नये म्हणून नीरजने चेहरा कापडाने घट्ट बांधून घेतला होता. गळा कापून घेतल्यानंतर मशीन कलंडल्याने बाजूला आवाज करत पडले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here