सायबर महिला महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे वार्षिक स्नेहसंभेलन आनंदोत्सव उत्साहात साजरे:

0
129


सायबर संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन येथे दि १७ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंभेलन आनंदोत्सव उत्साहात साजरे करण्यात आले. आरजे रसिका कुलकर्णी, एक्सिक्युटीव्ह प्रोड्युसर ९४.३ टोमॅटो एफएम या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. आय क्यू ए सी समन्वयक श्वेता पाटील यांनी महाविद्यालयाची उद्दिष्टे थोडक्यात माहिती दिली. अर्चना पाटील यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. रसिका कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणात त्यांनी आकाशवाणीतील त्यांचा प्रवास आणि यशाचे शिखर गाठण्याची त्यांची जिद्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यांचे वर्णन केले. विविध उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थिनींना प्रगती करण्यासाठीचे मार्ग सांगितले तसेच आरजे या सर्टिफिकेट कोर्स चालू केल्यास पूर्णपणे मदत करण्याचे आश्वासन दिले. प्राचार्य डॉ ए आर कुलकर्णी अध्यक्षीय भाषणात यांनी वार्षिक स्नेहसंभेलनासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थिनींना प्रबोधनपर भाषण केले. वर्षभरातील विविध उपक्रम तसेच वार्षिक क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पार पडले. जनरल चॅम्पियनशिप ऑफ २०२३-२४ हि फूड टेक्नॉलॉजी विभागाने मिळवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी शिंगे व आभार प्रदर्शन श्रुती गवळी यांनी केले. यानंतर विविध गुणदर्शनच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. सत्तरहुन अधिक कार्यक्रम विद्यार्थिनींनी सादर केले यात नृत्य, गायन व नाटक याचा समावेश होता. फूड टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख श्वेता पाटील, फॅशन डिझाईन विभाग प्रमुख ज्योती हिरेमठ, इंटिरियर डिझाईन विभाग प्रमुख सीमा पाटील, वाणिज्य विभाग समन्वयिका डॉ. सुनिता दलवाई, पर्यावरण विभाग समन्वयिका पूजा सरोळकर, क्रीडा शिक्षक रामेश्वरी गुंजीकर व ग्रंथपाल अनुराधा कुंभार तसेच सर्व विभागातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. आर. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्थ डॉ. आर. ए. शिंदे आणि सचिव सीए एच. आर. शिंदे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here